नवोपक्रमशील शिक्षिका सौ. शिल्पा वनमाळी यांचा इनरव्हील क्लब डहाणू यांच्यातर्फे बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मान

Rajan garud
0

नवोपक्रमशील शिक्षिका सौ. शिल्पा वनमाळी यांचा इनरव्हील क्लब डहाणू यांच्यातर्फे बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मान




इनरव्हील क्लब, डहाणू यांच्यातर्फे दरवर्षी शिक्षकदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा बेस्ट टीचर्स पुरस्कार प्रदान गौरव करण्यात येतो..

यावर्षी हा पुरस्कार जिल्हा परिषद शाळा आगवन नवासाखरा- केंद्र सावटे या शाळेवरील नवोपक्रमशील शिक्षिका सौ शिल्पा बळवंत वनमाळी यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

 कोरोना काळात शाळा बंद असतानाही ऑनलाइन तसेच ऑफलाईन पध्दतीने प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय ठेवण्यासाठी सौ. वनमाळी मॅडम यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत...

विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असतानाच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक साहित्य तसेच शाळेसाठी विविध भौतिक सुविधा मिळविण्यातही  त्या नेहमी प्रयत्नशील असतात. 

त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आज  इंनरव्हील क्लब ऑफ डहाणू यांनी बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)