#आधारकार्ड...
हे लेकरू दुसऱ्या वर्गात शिकत आहे, आज आधारकार्ड काढण्यासाठी तब्बल 7 कि मी आपल्या आजी सोबत डोंगरातून चालत येऊन महसेवा केंद्रावर येऊन आधारकार्ड काढले.
सर्वसामान्य घरात सुशिक्षित लोक मुलं जन्मल की वर्ष दोन वर्षात पालक आधारकार्ड काढून घेतात पण जे मुलं डोंगरदऱ्यात,रानावनात राहतात ज्यांचे पालक पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर करत असतात अशावेळी त्यांच्या मुलांचे आधारकार्डच काय मुलाच्या जन्माची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करायच राहून जात. ज्यावेळी मुलांना शाळेत दाखल केल जात त्यावेळी मुलांच्या ऑनलाईन नोंदीणीसाठी आधारची गरज भासते व शासनाचे पत्र येते तेंव्हा पालकांना आम्हा शिक्षकांना सांगावं लागत की आधारकार्ड काढल्याशिवाय पर्याय नाही.मग सुरू होते आमच्या गुरुजनांची आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ. मुलांना शोधा, त्यांच्या फोटो मोबाईल मध्ये काढा,शहरात जाऊन त्याच्या कॉपी काढा,ग्रामपंचायत मधून रहिवासी दाखले घ्या मग आधारकेंद्रावर जाऊन नोंदणी करा व जी तारीख मिळेल त्या दिवशी मुलांना घेऊन आधारकार्ड काढायला केंद्रावर घेऊन जा.
आजही तसच झालं वरच्या कागदोपत्राची जुळवाजुळव करून आज 7 मुलांचा आधारकार्ड काढायचा मुहूर्त सापडला व ठरल्याप्रमाणे गावात येणाऱ्या एकमेव बसने पालकांना मुलांना सोबत घेऊन आधारकेंद्रावर यायला सांगितलं व मी पुढल्या तयारीसाठी केंद्रावर थांबलो.पण आज अचानक वाडीत जाणारी बस कांही कारणाने वाडीत पोहचलीच नाही अस समजलं.अगोदरच दुर्गमभाग त्यात सकाळी 9 वाजता बसची एकच फेरी व तीही आली नाही म्हटल्यावर अडचणीचं अडचणी.त्यात सात पैकी एकही पालकांकडे मोबाईल नाही मग काय मी आधारकेंद्रावर मुलांची वाट पाहत बसलो नियोजित वेळच्या दोन तासाने 5 मुलं व पालक एका टेम्पोमध्ये कसेबसे आधारकेंद्रावर पोहचले.तो पर्यंत मी त्यांचे फॉर्म सबमिट करून नंबर लावून ठेवला होता.पण दोन मुलं आणखी येत नव्हते शेवटी 4 तासांनी ते दोघे आले तेंव्हा समजलं की मुलांना यायला कोणतंच वाहन भेटलं नसल्याने तब्बल 7 किलोमीटर चालत येऊन ह्या मुलांनी आधारकेंद्र गाठलं.एवढं चालत येऊनही मुलांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता कारण आधारकार्ड नावाचं काहीतरी काढायला गुरुजींनी शहरात बोलवलं हाच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.शेवटी सर्व 7 मुलांचे आधारकार्ड काढून घेतले व मुलांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेऊन पुन्हा आनंदाने आपली दुर्गमभागातील आदिवासीवाडी गाठली.
✍️ गजानन पुंडलीकराव जाधव
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 4 - बिरबल सापडला - Birbal Sapadla
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 3 अकबर बादशहा आणि पोपट - Akbar Badshah Ani Popat
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti 2 बिरबल काळा कसा झाला - Birbal Kara Kasa Jhala
अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi | Akbar Birbal Goshti