राज्यात आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ?? या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Rajan garud
0

 


राज्यातील बहुतांश भागात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.


यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. तर पुढील काही दिवस राज्यात भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेन्ज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

आज मंगळवारी ( 14 सप्टेंबर ) पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)