शिवरायांची जावळी स्वारी पहिला लष्करी पराक्रम - ऐतिहासिक वाटचाल

Rajan garud
0

  शिवरायांची जावळी स्वारी - ऐतिहासिक वाटचाल





🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेला जावळी विजय हा स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने पहिला देदीप्यमान पराक्रम मानला जातो. शिवचरित्रातील हा पहिला लष्करी पराक्रम आदिलशाही सुलतानाची झोप उडवणारा व अनेक मराठा सरदार देशमुखांना वास्तवाची जाणीव करून देणारा ठरला. जावळी विजया मुळेच स्वराज्य स्थापनेत लष्करी आर्थिक सामर्थ्य प्राप्त झाले. तसेच खऱ्याअर्थाने भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा चे रूपांतर स्वराज्यात झाले. आदिलशाहीची सेवा करण्यात स्वतःला धन्यता मानून स्वराज्य निर्मितीच्या कार्यात खीळ घालणाऱ्या व पुंड शाही माजवणाऱ्या लोकांवर शिवाजी महाराजांचा वचक निर्माण झाला. व स्वराज्यनिर्मीतीच्या मार्ग सुलभ झाला म्हणून जावळे विजय हा स्वराज्य निर्मिती मधील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

जावळीच्या स्वारीची कारणे

जावळीच्या स्वारीची खालीलप्रमाणे महत्वाची कारणे आहेत.

जावळीच्या प्रदेशाचे वैशिष्ट

जावळीचा प्रदेश हा अतिशय दुर्गम होता हा प्रदेश दाट जंगलांनी व्यापलेला होता. साताऱ्याच्या अगदी टोकाला जावळी हे खेडे आहे. या प्रदेशात पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. सह्याद्रीचा अरुंद सुळका समुद्रसपाटीपासून 4001 फूट उंच गेलेला असल्याने जावळीच्या पश्चिमेकडे त्याची एक नैसर्गिक भिंतच बनलेली आहे. या प्रदेशातून साठ निरनिराळ्या वाटा जातात. त्यापैकी दोन रस्ते मोठे असल्याचे दिसून येते. महाड चिपळूणकडे याच रस्त्याने मोठा व्यापार चालत असे. तसेच कोकण प्रदेशात जाणाऱ्या अनेक पायवाटा येथूनच निघतात. दाट जंगलांचा दर्‍या खोर्‍यांचा प्रदेश असल्यामुळे गनिमी कावा तंत्राचा वापर करण्यासाठी अत्यंत अनुकूल असा प्रदेश आहे.

जावळीच्या खोर्‍यात मोरे घराण्याचा अंमल चालत होता. मोरे घराणे एक पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. मोरे घराण्यातील लोक स्वतःला मौर्य यांचे वंशज मानत असत. सोळाव्या शतकापासून मोरे घराण्याची सत्ता जावळीच्या प्रदेशावर होती. विजापूरच्या आदिलशहाने मोरयांना जावळी ची जहागीर दिली होती. या घराण्यातील मूळ पुरुषाने मोठा पराक्रम गाजविला होता. ्यामुळे मोर्‍यांच्या घराण्याला चंद्रराव हा किताब मिळाला होता. त्यामुळे या घराण्यातील प्रमुख पुरुष चंद्रराव मोरे या नावानेच ओळखला जात असे. मोरे एका अर्थाने आदिलशाही सत्तेचे मांडलिक होते. तरी मोरे स्वतःचा उल्लेख राजे म्हणून करीत असत. जावळी खोरे व आजूबाजूच्या प्रदेशावर मोरेचा वचक होता. त्यामुळे त्या भागातील लोक मोरयांना बादशहा सारखा बहुमान देत असत. तत्कालीन महाराष्ट्रातील मातब्बर घराण्यांमध्ये मोरे घराण्याची गणना होत असे.

जावळीचे मोरे व शिवाजीराजे यांचे संबंध

इ 1648 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे हे निपुत्रिक वारले. दौलतराव यांच्या विधवा पत्नीने सर्व नातलगांना बाजूला सारून यशवंतराव मोरे नावाच्या चाळीस वर्षाच्या गृहस्थास दत्तक घेतले. व मोरे यांच्या गादीवर बसविले. राजांनी यासंदर्भात यशवंतराव मोरे यांना सहाय्य केले. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जावळीच्या मोरेचे आपणास सहकार्य मिळावे. अशी शिवाजी महाराजांची भूमिका होती. मोरे दत्तक प्रकरणात शिवाजींनी सहकार्य दिले ही गोष्ट विजापूरच्या आदिलशहाला मुळीच आवडली नाही. कारण मोरे हे विजापूरकरांचे मांडलिक होते. मोरांच्या गादीवर कोणास बसवायचे यासंबंधीचा अधिकार विजापूरच्या आदेशाशिवाय हे अन्य कोणालाही नव्हता. त्यामुळे मोरे प्रकरणात आदिलशहा हा नेमका कुठे व कसा दुखावला होता हे लक्षात येते. यशवंतराव मोरे या सर्व प्रकारे सहकार्य शिवाजीराजांनी केले होते. कारण स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोरेचे आपल्याला सहकार्य मिळावे अशी महाराजांची भूमिका होती परंतु यशवंतराव मोरे यांना या सर्व गोष्टींचा विसर पडून शिवाजीशी कृतघ्नपणा दाखविला. त्यामुळेच शिवाजी महाराजांना जावळीच्या प्रदेशावर स्वारी करणे भाग पडले.




जावळी स्वारीची कारणे

  1. चंद्ररावांचे कृतघ्नपणा :- जावळीच्या जहागिरीत वारसाहक्काचे भांडण चालू असताना शिवाजी महाराजांनी मदत केली. परंतु अफजलखानाने मोरयांना तंबी देताच यशवंतराव व त्यांचे कारभारी हनुमंतराव या दोघांनी महाराजांचे उपकार विसरून कृतघ्नपणा दाखविला. व शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया सुरू केला.
  2. चंद्ररावांचे उद्दामपणा चे धोरण :- बिरवाडी भागातील काही गावच्या पाटील चे अधिकार बाजी व मालोजी पाटलांकडे होते. चंद्रावानी आपल्या उद्दाम नीतीचा वापर करून या गावाची पाटीलकी गिळंकृत केली. बाजी व मालोजी पाटलांनी शिवाजीराजांच्या सहकाऱ्यांनी आपल्या गेलेल्या पाटील त्या मिळवल्या त्यामुळे चंद्रराव मोरे याचा संताप अनावर झाला.
  3. चंद्ररावांची खोडकर वृत्ती :- मावळातील छोट्या-मोठ्या वतनदारांना संघटित करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न चालविला होता. जावळी सारखे बलवान राज्य आपले मित्र बनवावे. व त्यांनी स्वराज्याच्या कार्यात सहकार्य द्यावे. अशी शिवाजी महाराजांची भूमिका होती. ्या जाणिवेतूनच शिवाजी महाराजांनी मोर्‍यांच्या वारसदार नियुक्त करण्यात खूप सहकार्य दिले होते. शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्मिती मुळे आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला धोका पोहोचेल असे वाटल्याने त्यांनी शिवाजीराजांची विरोध करण्याचे धोरण स्वीकारले.
  4. स्वराज्यातील गुन्हेगारांना पाठिंबा:- मुसेखोऱ्यातील एक कुलकर्णी रंगो त्रिमल याने एका विधवा ब्राह्मण स्त्री वर बलात्कार केला. व तो जवळच्या प्रदेशात पळून गेला मोर्‍यांनी त्यास आश्रय दिला. तसेच चिखली गावचे पाटील रामोजी वाडजे कर यास चंद्ररावांनी तो शिवाजीराजांच्या प्रदेशात असताना ठार मारले. हे दोन्ही प्रकार शिवाजी महाराजांना आवडले नाहीत म्हणून त्यांनी मोरयांना योग्य धडा शिकविण्याचा मार्ग पत्करला.
  5. चंद्र रावांची शिवाजी राजा विरोधी धोरण:- चंद्ररावांचे सतत विरोधी वागण्यामुळे शिवाजी महाराज व चंद्रराव यांच्यात अधिक वितुष्ट निर्माण होत गेले शिवाजीराजांच्या महत्त्वाकांक्षी वृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न जावळीच्या मोरया कडून सातत्याने होऊ लागला. स्वराज्यस्थापनेच्या मार्गात आलेला हा काटा काढून टाकणे हे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने आव्हान होते.
  6. स्वराज्यात फूट पडण्याची वृत्ती :- चंद्ररावाकडून स्वराज्यात फूट पाडण्याच्या धोरणांचा पाठपुरावा करण्यात आला. गुंजा मावळ्याच्या देशमुख बद्दल शिळीमकर चोरगे यांच्यातील वाद बराच जुना होता ह्यात शिवाजीमहाराजांनी शिळीमकर यांची बाजू उचलून धरली होती. शिलमकरांचे देशमुखीवर ताबा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी शिलमकरांना मदत केली. असे विष शिलमकरांच्यां मनात कालवले गेले. स्वराज्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने फूट पाडण्याची चंद्र रावांची ही नीती ठेचून काढले पाहिजे या जाणिवेतून जावयाची मोहीम आखली गेली.
  7. वाटाघाटी चा मार्ग :- चंद्रराव मोरे यांचा पाडाव करण्यापूर्वी तो सामोपचाराचा मार्गाने अंकित होतो काय म्हणून शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारच्या वाटाघाटी केल्या. अखेर त्यांनी चंद्ररावांना इशारा दिला की तुम्ही अंकित झाला नाहीत तर जावळी ताब्यात घेऊन तुम्हाला कैदेत टाकू असे कळविले. या अखेरच्या इशाऱ्याची देखील चंद्रराव गांभीर्याने दखल घेतली नाही शेवटी जावळीवर हल्ला करण्याशिवाय शिवाजीराजांना गत्यंतरच उरले नाही.
  8. अफजलखानाचे प्रोत्साहन :- इसवी सन 1649 मध्ये आदिलशाही सरदार अफझलखान यांची वाई प्रांताचा सुभेदार म्हणून नियुक्ती झाली. अफझलखान च्या प्रोत्साहनामुळे चंद्ररावअधिकच शिरजोरी ने वागू लागला. परंतु 1654 मध्ये अफजलखानास कनकगिरीच्या मोहिमेवर नियुक्त करण्यात आले म्हणून शिवाजी महाराजांच्या मार्गातील अडसर कमी झाला होता.
  9. हिंदवी स्वराज्य स्थापनेचा हेतू :- हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जावळी जिंकून घेणे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे मराठी जागीरदार यांना वठणीवर आणून त्यांच्या प्रदेश स्वराज्यात घेतल्याशिवाय महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे ध्येय साकार होणार नव्हते. तेव्हा जावळीचा पाडाव हा स्वराज्य स्थापना मधील एक महत्त्वाचा टप्पा होता म्हणून सभासद बखरीमध्ये “चंद्रराव मोरे यांना मारल्याशिवाय राज्य साधत नाही” असे म्हटले आहे.
  10. जावळी चे भौगोलिक महत्त्व:- जावळीचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी वसलेला होता. जावळीच्या प्रदेशामुळे एकीकडे आदिलशहावर दुसरीकडे पुणे जहागिरीवर तर तिसरीकडे कोकणपट्टी च्या प्रदेशावर नियंत्रण ठेवले सुलभ जाणार होते. गनिमी कावा तंत्राचा सफाईदारपणे वापर करण्यासाठी एवढा अनुकूल प्रदेश महाराष्ट्रात कुठेही नव्हता. भौगोलिक लष्करी व्यापारी दृष्ट्या हा प्रदेश अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या प्रदेशाचा समावेश झाल्यानंतर स्वराज्याच्या सामर्थ्यात खूप भर पडणार होती.

वरील सर्व कारणांमुळे शिवाजी महाराजांना जावळीवर स्वारी करणे अत्यावश्यक झाले होते. स्वराज्य स्थापनेसाठी व स्वसंरक्षणासाठी ते खूप खूप महत्त्वाचे होते. जावळी भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाची होती. व या प्रदेशाच्या सहाय्याने राजांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. व मूठभर सैनिकांनी हजारो मुघल सैन्यासह युद्ध जिंकले होते. म्हणून इतिहासामध्ये व स्वराज्य निर्मिती मध्ये जावळीच्या स्वारीला तसेच जवळच्या प्रदेशाला अतिशय महत्त्व आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)