शाळा स्वच्छता कृती आराखडा जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न
स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय अंतर्गत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक शाळेत मुलांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, मुलांमुलींसाठी स्वतंत्र शौचालय तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय आणि साबण व पाण्याने हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. Covid 19 ह्या साथीच्या काळात उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये बदल करणेही आवश्यक आहे. या सर्व घटकांची पूर्तता करणे, त्यासाठी जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती जाणून घ्यावी लागणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयाचे बेंच मार्किंग करावे लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे विचारात घेऊन स्वच्छता कृती आराखडा बनविणे आवश्यक आहे. जेणेकरुन पाणी,
स्वच्छता व आरोग्य संदर्भातील सद्यस्थिती व पुढील कालावधीत करावयाचे नियोजन याबाबत योग्य माहिती उपलब्ध होईल.
सबब शाळा स्वच्छता कृती आराखडा या विषयाबाबतचे पालघर जिल्हास्तरीय online platform चा वापर करून फेसबुक लाईव्ह प्रशिक्षण सोमवार दिनांक ३०ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.०० या कालावधीत पालघर ,डहाणू ,वसई ,तलासरी या तालुक्यांचे व दुपार सत्रात ३ ते ५ या वेळेत वाडा,विक्रमगड ,जव्हार,मोखाडा या चार तालुक्यांचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( DIET) शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले.या प्रशिक्षणात विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती ,IED विशेष तज्ञ ,विशेष शिक्षक,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आदी सहभागी झाले होते.
सदर जिल्हास्तरोय प्रशिक्षणास , पालघर जिल्ह्याचे आदरणीय मा .मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय मा .श्री.सिद्धाराम सालीमठ साहेब ( भा .प्र .से ) व प्राथमिक शिक्षणाधिकारी व DIET प्राचार्या आदरणीय श्रीमती .लता सानप मॕडम ह्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली व श्री तानाजी डावरे ,सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभाग DIET यांच्या उत्कृष्ट नियोजनाने संपन्न झाले.या जिल्हास्तरीय प्रशिक्षणात श्री मनोज राऊत (मुख्याध्यापक वसई), श्रीमती जाॕलिना फरगोज (वसई), श्री उमेश खिराडे ( वाडा ), श्रीमती रंजना भिसे ( डहाणू ), श्री राजन गरुड (पालघर), श्रीमती निकेता गोस्वामी ( मोखाडा), श्रीमती साधना भानुशाली (वाडा ), श्री सुरेश भांड ( विक्रमगड), श्री लक्ष्मण ननावरे (तलासरी), श्रीमती आरती गवादे (पालघर), श्रीमती स्वेजल म्हात्रे (पालघर), श्री संतोष अंकारम (डहाणू), श्री दिनकर फसाळी (मोखाडा) व श्रीमती मंजूळा भोये( जव्हार ) यांनी मास्टर ट्रेनर ,सुलभक म्हणून मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणात सत्र१ अ) स्वच्छा भारत स्वच्छ विद्यालय ,उपक्रम व शालेय स्वच्छता ,पाणी आरोग्य ब) स्वच्छ विद्यालय पुरस्कार क) शाळा स्वच्छता आराखडा ३) सत्र२ हात धुण्याच्या सुविधांचे तंत्र विकसित करतांना लक्षात ध्याक्याच्या गोष्टी ३) सत्र ३ कोरोना आणि शाळा ४) सत्र४ शालेय पाणी स्वच्छता व आरोग्य यांचे मुख्य भागीदार व त्यांची भूमिका.५) सत्र ५ अनुभव कथन व शिक्षकांना मार्गदर्शन ६) सत्र ६ टाळेबंदीच्या काळात मुलांच्या मानसिकतेवर झालेले परिणाम व कोविड १९ बददल समज व गैरसमज .७) सत्र ७ शाळांमधील HWS ची निर्मिती याविषयांवर सविस्तर मार्गदर्शन कारण्यात आले.या संपूर्ण प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन अर्चना चौधरी ,पदविधर शिक्षिका कुडूस ता.वाडा व सौ . रेखा दिब्रीटो (वसई ) यांनी केले.तर आभारप्रदर्शन श्री विलास ठाकरे सर( साधनव्यक्ती , वाडा ) व सुषमा लोपीस ( साधन व्यक्ती , वसई ) यांनी केले.
"शाळा स्वच्छता जिल्हास्तरीय आराखडा प्रशिक्षण कार्यक्रम"
सत्र 3 - कोरोना व शाळा
DIET पालघर आयोजित,
🦠🧹🦠🧹🦠🧹🦠🧹🦠🧹🦠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सत्र -४ शालेय पाणी,स्वच्छता व आरोग्य याचे मुख्य भागीदार व त्यांची भूमिका
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
इतर सत्र पाहण्यासाठी गरूडझेप या युट्युब चॅनेल ला SUBSCRIBE 🛎️ करा.