TET परीक्षा प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरूप कोणते आहे?
कोरोना प्रादूर्भावासह यूपीएससी व एमपीएससी परीक्षा सदर दिवशी असल्यास 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेतस्थळावर घोषित करण्यात आले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा कोणत्या स्तरावर घेतली जाते?
1.प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
2.उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
TET ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून ऑनलाइन सुरु झाली आहे.
टीईटी परीक्षा पेपर १ व २ साठीचे वेळापत्रक, परीक्षा फीस, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आराखडा व संदर्भ पुस्तके यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
MAHA TET 2021 अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?
१.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते ७ सप्टेंबर २०२१
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
३. टीईटी पेपर १ दिनांक व वेळ - १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००
४. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ - १० ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०
TET परीक्षा शुल्क किती आहे?
१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. - ५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग - २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये (दोन्ही पेपर )
TET परीक्षा प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरूप कोणते आहे?
(1)TET पेपर 1 अभ्यासक्रम कोणता आहे?
१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. या अभ्यासासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील डॉ.शशिकांत अन्नदाते यांचे पुस्तक अभ्यासणे अतिशय महत्वाचे ठरते.
2.मराठी भाषा(30 गुण)
यामध्ये मराठी व्याकरण,उतारे,कविता,लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.यासाठी के'सागर,बाळासाहेब शिंदे, डॉ.आशालता गुट्टे,विनायक घायाळ यापैकी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासावीत.
3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)
यामध्ये इंग्रजी व्याकरण,उतारे,कविता,लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.यासाठी
के सागर, एम.जे.शेख, बाळासाहेब शिंदे यातील कोणत्याही दोन पुस्तकांचा अभ्यास करावा.
4.गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. यासाठी
नितीन महाले,अजय चव्हाण,शांताराम अहिरे,सतीश वसे, डॉ.आर.एस.अग्रवाल यापैकी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासावीत.
5.परिसर अभ्यास (30 गुण)
यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित बेसिक प्रश्न विचारले जातात.यासाठी पाचवी ते दहावीची संबंधित विज्ञान, इतिहास, भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके अभ्यासावीत.
तसेच वरील सर्व घटकांच्या एकत्रित तयारीसाठी के' सागर सरांचे TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक उपयुक्त ठरते.
परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण व प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक ठरतो.त्यासाठी के'सागर पब्लिकेशन्सचे
TET पेपर पहिला 7 सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या मागील 6 प्रश्नपत्रिका हे पुस्तक अभ्यासावे.
(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम काय आहे?
यामधील अभ्यासक्रमात पेपर एक प्रमाणेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्रजी विषयाचा समान स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे.
यात गणित व विज्ञान आणि सामाजिकशास्त्र(इतिहास व भूगोल) यापैकी आपल्या पदवी विषयाशी संबंधित गट निवडावा लागतो. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
गणित व विज्ञान (60 गुण)
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30 गुण आहेत.
गणित विषय अभ्यासक्रम स्वरूप पेपर एक प्रमाणेच आहे.
विज्ञान (30 गुण) विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात.यासाठी
प्रा.अनिल कोलते, चंद्रकांत गोरे,कविता भालेराव व विनायक घायाळ यापैकी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासावीत.तसेच 5 वी ते 10 वी विज्ञान पाठ्यपुस्तके अभ्यासणे अतिशय महत्वाचे आहे.
सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
इतिहास (30 गुण)
इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित मूलभूत प्रश्न विचारले जातात. यासाठी पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके अभ्यासणे महत्वाचे आहे.
भूगोल.(30 गुण)
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले जातात. यासाठी इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके अभ्यासणे अतिशय महत्वाचे आहे.
तसेच पेपर दोनच्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करण्यासाठी
TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ यांचे पुस्तक अभ्यासावे.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत?
★ बेसिक संदर्भ पुस्तके वाचण्यावर भर द्यावा.
★मागील टीईटी पेपर एक व पेपर दोनच्या मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करा.
★टीईटी परीक्षेत 90 प्लस गुण मिळवण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे अभ्यास करा.
★वेळेचा अपव्यय करणाऱ्या सर्व बाबींपासून दूर रहावे.
★बालमानसशास्त्र विषय चांगला समजून घेतल्यास व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास दोन्ही पेपरमध्ये अधिक गुण निश्चितपणे मिळविता येतील.
★परीक्षेसाठी घटकनिहाय संदर्भ पुस्तके वाचावीत.
★इतिहास, भूगोल, विज्ञान व गणित विषयांची पाचवी ते दहावी पर्यंतची पाठ्यपुस्तके वाचावीत.
★शक्य असल्यास नोट्स काढा/पाठ्यपुस्तकातीळ महत्वाच्या मुद्यांना अंडरलाइन करा.
★प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत सोडविण्याचा सराव करावा.
★टीईटी परीक्षा होईपर्यंत फेसबुक, व्हाट्सप पासून दूर राहिल्यास बराच अभ्यासक्रम कव्हर होईल.
★परीक्षेला सकारात्मकतेने "टीईटी पास होणारच" या आत्मविश्वासाने सामोरे जा