चारोळी स्वातंत्र्य दिनाच्या ...

Rajan garud
0

 चारोळी स्वातंत्र्य दिनाच्या 





सर फाउंडेशन पालघर ,आयोजित "चारोळी स्पर्धा २०२०" या स्वातंत्र्य दिनानिमित्त च्या स्पर्धेतील चारोळी आता तुम्ही येथे बघू शकता.  



असे अतिप्रिय आम्हांस

स्वातंत्र्य ,समता, बंधुता

एकसंध राखो आम्हांस

आमची अखंड एकता



घरदार सोडिले स्वातंत्र्यासाठी

प्राण वाहिले स्वातंत्र्यासाठी

एकसंध राहिले स्वातंत्र्यासाठी

ते अमर हुतात्मे स्वातंत्र्यासाठी




जेथे जावे तिथे पाहावे 

नारा फक्त्त स्वातंत्र्याचा, 

ज्याच्या त्याच्या तनामनात 

स्विकार मात्र स्वैराचाराचा




हुतात्म्यांच्या रक्ताने 

मिळाले आम्हा स्वातंत्र्य, 

लोकशाहीचा नुसताच बाऊ 

नशिबात मात्र पारतंत्र्य




दोष न द्यावा स्वातंत्र्यास

झाकून पाहा गिरेबानांस

आपण चुकतो वागण्यात 

दोष का द्यावा स्वातंत्र्यास




मिळालं जेव्हा स्वातंत्र्य 

धरणीमाताही आनंदी झाली असेल, 

स्वैराचाराचा भस्मासुर पाहुनी 

तीही आज गहिवरली असेल




वर्धापनदिन उत्सवाचा!

स्वातंत्र्य दिनाचा,

विळखा कोरोनाचा,

निष्पाप जिवांचा!!??




स्वातंत्र्य बलिदानांचे!

अखंड पराक्रमांचे!

राजकारणी फितूरांचे?

कलयुगातील मतलबींचे!?




स्वातंत्र्य सैनिकांचे,

व्यर्थ बलिदानांचे?

तटस्थ नागरिकांचे! ,

निष्ठावान देेशभक्तींचे!?




या भीषण महामारीत

जगाने खूप काही गमावलं, 

पण स्वातंत्र्याच्या  नावाने स्वैराचार करू पाहणाऱ्या

प्रत्येकास कोरोनाने नक्कीच  नमवलं




फुले वेचले शूरवीरांनी,

सुवास उपभोगतो आम्ही,

काटे तुडवली क्रांतीकारकांनी,

*स्वातंत्र्याच्या* गालीच्यात लोळतो आम्ही.




गमक स्वातंत्र्य?

विखारी पारतंत्र्य!

इंग्रजी विळखा?

मराठी स्वातंत्र्य!?



उत्सव तीन रंगाचा,

उत्सव जबाबदारीचा, कर्तृत्वाचा,

उत्सव अधिकाराचा, लोकशाहीचा

उत्सव स्वातंत्र्य दिनाचा



आठवण बलिदानाची

आठवण त्यागाची,

आठवण शौर्याची,

आठवण स्वातंत्र्याची




आला मोठा कोरोना,

कोणी नाही घाबरणार,

तिरंगा फडकणार राजपथावर,

स्वातंत्र्यदिन साजरा होणार घराघरात




बंधुतेचा पुकारा स्वातंत्र्य

समतेचा नारा स्वातंत्र्य

विश्वबंधुत्वाचा वारा स्वातंत्र्य

भारतवर्षाचा सहारा स्वातंत्र्य




लाभले आम्हांस स्वातंत्र्य

ना राहिले भारतात पारतंत्र्य

लाभ घेऊ आपण स्वातंत्र्याचा

वसा बाळगू आपण देशभक्तीचा




या रे या सारेजण

मिळून गाऊ सर्वजण

गीत आपुल्या स्वातंत्र्याचे

गीत आपुल्या ऐक्याचे




भारतवर्ष नाही कोण्या

एका धर्माचा वा जातीचा

धर्मनिरपेक्षता वसण्या

पुकारा हा स्वातंत्र्याचा




इथे प्रत्येकजण

स्वतः साठी जगत असतो,

देशासाठी जगण्यासाठी

फक्त स्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)