सफाळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वाटप - संकल्प फाउंडेशन मुंबई

Rajan garud
0

संकल्प फाऊंडेशन मुंबई ,यांच्या मार्फत सफाळे शैक्षणिक तालुक्यातील 37 शाळांमधील 2000 च्या आसपास विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप .

आज दिनांक  :-31/07/2021 रोजी    संकल्प फाऊंडेशन   ,मुंबई यांच्यामार्फत सफाळे शैक्षणिक तालुक्यातील 37  जिल्हा परिषदेच्या  शाळांना प्रति विध्यार्थी 1 दप्तर व शैक्षणिक साहित्य अशे एकूण 2000 च्या आसपास  विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  

     सदर शैक्षणिक साहित्य यांची एकूण रक्कम साडे सात लाख रुपये एवढी होती ,सदर साहित्याची  किंमत बाजार भावानुसार अंदाजे साडे 10 लाख होईल एवढे शैक्षणिक साहित्य विध्यार्थी गुणवत्ता वाढावी हा संकल्प ठेवून वाटप करण्यात आले .

  सदर कार्यक्रम हा सफाळे no 1 ह्या शाळेत कोरोना काळातील नियमांचे पालन करत केंद्र निहाय शाळांना नियोजन बद्ध कृती करून साहित्य वाटप करण्यात आले. सदर शैक्षणिक साहित्याचे विध्यार्थ्यांना नक्कीच खूप मोठया प्रमाणात लाभ होणार आहे. 

  शालेय विध्यार्थ्यांना  अधिका अधिक  शैक्षणिक गुणवत्तेशी जोडून राहावे यासाठी ,

संकल्प फाउंडेशन, बालकुम ठाणे

 यांनी जे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले .ते संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष 

मनीष पालीवाल,  कार्यकारी सदस्य ,अनिश ठाकुर,  मुकेश चोकसी, सागर मंत्री, रमेश सिंग, हेमन्त मांजरेकर, संजय खेर,  रविन्द्र माने, तसेच त्यांची संपूर्ण संकल्प फाऊंडेशन चे सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

    सदर  आनंद मय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफाळे no 1 च्या शिक्षिका सौ प्रगती पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाचे नियोजण व केलेल्या कार्याचे संपूर्ण इतिवृत्त माननीय सौ कुंदा संखे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी  यांनी  व्यक्त केले .

  सदर शैक्षणिक कार्यक्रम वेळी सफाळे no 1 चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री निलेश वैती व खार्डी शाळेचे प्रमुख शिक्षक श्री राजेश राणे यांनी शिक्षकाच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार श्री भानुदास लोखंडे शाळा:- बेलकरिपाडा यांनी व्यक्त केले .

  सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी शिक्षक - निलेश वैती , विजय रावळ ,भानुदास लोखंडे,  प्रविणकुमार शिंदे,राजन गरुड,सचिन बाम्हणकर ,दत्ता ढाकणे,कल्पेश पाटील , मनिष पाटील , उज्वला वर्तक ,प्रज्ञा पाटील,तसेच सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली .

   संकल्प फाउंडेशन यांना ,सफाळे शैक्षणिक तालुक्यातील शाळांना शैक्षणिक साहित्य मिळावे  यासाठी विशेष मेहनत घेणारे श्री प्रविण ठाकूर सर  यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)