महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 वेळापत्रक MahaTET 2021 Update

Rajan garud
0

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 वेळापत्रक

MahaTET 2021 Update


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार, १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होत असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

या भरती संदर्भातील
पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 
मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


परीक्षेचे वेळापत्रक – MahaTET 2021 Timetable

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१ (वेळ रात्री २३.५९ वाजेपर्यंत)
  • प्रवेशपत्राचे ऑनलाईन प्रिंट घेणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १- १० ऑक्टोबर २०२१ सकाळी १०.३० ते दुपारी १
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर २ – १० ऑक्टोबर २०२१ दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

Maharashtra TET Exam 2021 Details – राज्यात दोन वर्षांनी होतेय शिक्षक पात्रता परीक्षा, तारखा जाहीर


आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

TET परीक्षा दोन गटात
साधारपणे TET परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात.

टीईटीचे दोन पेपर
साधारणपणानं टीईटीचे दोन पेपर घेण्यात येतात. महाराष्ट्रात टीईटी परीक्षेचं आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात येतं. 1 ली ते 5 वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी एक पेपर द्यावा लागतो. तर सहावी ते आठवीची परीक्षा देण्यासाठी दुसरा पेपर द्यावा लागतो. टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयाती डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न

बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.

पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.

टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा? (How To Apply Maha TET 2021)

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर येत्या काही दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. टीईटी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केल जाईल.

MahaTET साठी Eligibility काय आहे

खासगी शाळांतील शिक्षकभरती निवडणुकीनंतर

पोलीस भरती – पोलिसांची ८,७५७ पदे लवकर भरा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)