सर फाऊंडेशन
"पालघर जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान " पुरस्कार जाहीर
स्टेट
इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम
च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील आठ कर्तृत्ववान शिक्षिकांचा
जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. शिक्षिका
म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून
अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग व covid काळातील योगदान याचा विचार करून या
पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गरुडझेप
यावर्षी च्या पुरस्कार विजेत्या मध्ये
सौ.अश्विनी अशोक राऊत शाळा - जिल्हा परिषद शाळा वेवूर ता.जि . पालघर सौ.सुनीता अनिल
सैंदाने जि प शाळा सावटे मराठी,ता-डहाणू ,जि -पालघर श्रीम. गीतांजली बाबासाहेब
काशीद शाळा- जिल्हा परिषद शाळा पाचघर, ता.- मोखाडा, जिल्हा-पालघर, सौ रूतिका राजेश
भोईर जिल्हा परिषद शाळा वाडा ता. वाडा जि. पालघर श्रीम. निता बारीकराव साळुंके
जिल्हा परिषद प्राथ व माध्य शाळा आमगाव पाटीलपाडा ता.- तलासरी, जिल्हा-पालघर
सौ.रुचिता महेश सूर्यवंशी जि प नेहरू हिंदी विद्यालय विरार,ता-वसई जि पालघर
श्रीम.आदिती अनिल मांजे जि प शाळा चौधरीपाडा, ता-विक्रमगड जि पालघर श्रीम.शुभांगी
सखाराम भांगरे शाळा- जिल्हा परिषद प्राथ .शाळा वडोली ता.- जव्हार जिल्हा-पालघर
यांची निवड झाली आहे. अशी माहिती जिल्हा समन्वयक श्री.विजय वाघमारे श्री .राजन
गरुड,सौ .शिल्पा वनमाळी व श्री.आनंद आनेमवाड यांनी दिली.
कोविड 19 बाबत
राज्यशासनाच्या कार्यक्रम आयोजनबाबतच्या समस्या लक्षात घेता प्रत्यक्ष पुरस्कार
कार्यक्रम हा निश्चित अवधीत पार पडणार आहे.
या निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला
राज्य समन्वयक सौ.हेमा शिंदे (वाघ )मॅडम,राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व
बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.