आदिवासी वारली बोलीभाषा समस्या बनले अध्ययन साहित्य .....

Rajan garud
0

आदिवासी वारली बोलीभाषा समस्या बनले अध्ययन साहित्य .............
                  भाषा हे संवादाचे  माध्यम आहेआपल्या मनातील भावभावना ,विचार व्यक्त करण्यासाठी भाषा ही माध्यम म्हणून वापरली जातेमहाराष्ट्रात पूर्वीपासून मराठी भाषा बोलली जातेज्ञांनेश्वरांनी सुद्धा मराठी भाषेची गोडवी आपल्या ज्ञानेश्वरीत मांडली आहेत." माझा मराठीचि बोलू कौतुके ! परि अमृतातेही पैजासी जिंके !!आजही सर्व शासकीय व्यवहारासाठी मराठी हीच अभिजात भाषा वापरली जाते.
         महाराष्ट्र राज्य हे विविधतेने नटलेले  सजलेले आहेमहाराष्ट्र राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये डोंगर, दरी, पठारे, .किनारपट्टी, असे वैविध्य असून या भूभागात अनेक आदिवासी जमात वास्तव्य करीत आहेतया जमाती फार पूर्वीपासून  जंगलात कोणत्याही सुविधेशिवाय वाडी  वस्ती  आणि पड्यांवर एकत्रित राहत आहेया जमातीत कातकरी, ठाकर, भिल्ल, गोंड,माडीया,वारली, मल्हार-कोळी, धोडी  इत्या.चा समावेश प्रामुख्याने  होतो.ह्या सर्व बोलीभाषिक समाजाचे व्यवहार आजही बोलीभाषेतून होताना दिसतात,त्यांना आपल्या भावना ,विचार व्यक्त करण्यासाठी कधीही प्रमाण भाषेचा वापर करावा असे वाटत नाही. बोलीभाषा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.हजारो वर्षापासून जपलेली आपली बोलीभाषा भविष्यात ही असाच प्रकारे टिकून राहील अशी अपेक्षा आहे. आजही महाराष्ट्रात अनेक जमाती बोलीभाषेचा वापर करतात परंतु शालेय अभ्यासक्रम हा प्रमाणभाषेत म्हणजेच पूर्ण मराठीत आहे ,अशावेळी  आदिवासी जमातीतील बोलीभाषिक मुलांच्या शैक्षणिक विकासावर बोलीभाषा ही समस्या बनत चालली आहे आणि 9 वर्षाच्या अंनुभावातून हीच बोलीभाषा समस्येचे मी अध्ययन साहित्यामध्ये रूपांतर केले आणि शाळेत दाखल होणार्‍या मुलासाठी त्याची बोलीभाषा शिक्षणात मी वापरू लागलो.
                    पालघर जिल्ह्यातील बरेचसे तालुके डोंगराळ भागात स्थिर असून या तालुक्यात वारली जमात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करीत आहे.अशाच पालघर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून मी गेली  वर्षे कार्यरत असून येथील वारली समाजातील जीवनमान, चालीरीती,रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, शैक्षणिक मागासलेपणा, बोलीभाषेचा अधिक प्रभाव इत्यादिमुळे येथील विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यास करताना प्रमाण भाषेत अनेक अडचणी येतात याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो ,याची जाणीव झालीयासाठी मी स्वतः या समाजात  वर्षे रहिवास करून त्यांची भाषा अवगत केली आणि विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेकडे घेऊन जाण्यासाठी एक आव्हानात्मक पाऊल मी टाकत आहे इयत्ता १ली तील दाखल प्रत्येक बालकाला बोलीभाषेची आवड निर्माण करून देणे  त्याला प्रमाणभाषेकडे मार्गस्थ करणे , अशी कल्पना मला सुचली.
           विद्यार्थ्यांना प्रमाणभाषेतील जाणवणारी बोलीभाषा ही अडचण दूर करण्यासाठी मी सन २०१६-१७ मध्ये शालेय स्तरावर इयत्ता १ लीसाठी “ आदिवासी वारली बोलीभाषेतून अध्ययन साहित्य निर्मिती केली.” सदर उपक्रमाची कार्यवाही आपणासमोर मांडत आहे.
नवोपक्रमाचे नियोजन
               शालेयस्तरावर उपक्रमाची कार्यवाही करताना आदिवासी वारली बोलीभाषा अवगत विद्यार्थ्यांना प्रमाणभाषेची ओढ निर्माण होण्यासाठी इयत्ता १ली  शाळेत दाखल होणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेत अध्ययन अध्यापन करण्यासाठी वारली बोलीभाषेत इयत्ता १ली चे पाठ्यपुस्तक अनुवादीत केलेबोलीभाषेत विविध गोष्टी,संवाद,गाणी,चित्रकथा, वारली वर्णमाला ,शब्दसंग्रह बनवून नवोपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
दाखल झालेल्या नवगताना वारली बोलीभाषेत बोलण्यास अथवा व्यक्त होण्यास संधी देणे.
पहिलीचे वारली बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकातील कविता अनूवाचन घेणे.
साभिनय वारली भाषेतील गाणी,कविता, नाटयीकरण,संवाद घेणे.
प्रथम सत्र अखेर वारली वर्णमाला घेणेउदा अनुना ( सीताफळ),आर ( अजगरअशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या परिचयाची शब्द वर्णमालेत आहेत.
मुळाक्षरे समजपुर्वक वाचता आली की प्रमाणभाषेची शब्द वाचनासाठी देणे म्हणजे प्रमाणभाषेची जोड मिळेल.
    अशाप्रकारे ,स्वत:च्या बोलीभाषेतून शिकताना नवीन भाषेची कोणतीही भीती  बाळगता सहज मुलगा वाचनाचा टप्पा पार करेल आणि प्रमाणभाषा वाचन –लेखन याची सुरुवात होईल,
सदर  ते  महीने म्हणजे प्रथम सत्रात इयत्ता पहिलीसाठी राबविण्यात आलेला हा यशस्वी  उपक्रम आहेमुळाक्षरांचे वाचन टप्प्यासाठी साधारण     महीना सरावासाठी घेतला.

नवोपक्रमाची कार्यपद्धती
                    आदिवासी वारली बोलीभाषा अध्ययन साहित्य निर्मिती  या उपक्रमांतर्गत हा उपक्रम प्रथम शाळेत राबविला . एक गोष्ट आदिवासी वारली भाषेत भाषांतर केली असता विद्यार्थी प्रतिसाद चांगला मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक स्वरुपात पक्षी, फुले ,फळे, भाज्या यांची नावे ,शब्दार्थ याचे संकलन करण्याचा स्वाध्याय दिला.याठिकाणी मुले खूप उत्साही दिसले आणि उपक्रम तयार झाला.
                सर्वप्रथम इयत्ता पहिलीचे पुस्तक भाषांतरित करून वारली बोलीभाषेत तयार करून त्या पुस्तकातील पाठ्यक्रम वारली भाषेत इयत्ता  ली  २री च्या १७ मुलांना  शिकविण्यास सुरुवात केली . मुलांचा प्रमाण भाषा शिकण्याची ओढ निर्माण झालीशाळेत  येणारी ,सतत गैरहजर राहणारी मुले या बोलीभाषेच्या उपक्रमासाठी शाळेत नियमित  येऊ लागलीभाषेच्या या उपक्रमात इयत्ता १ली ते २री  चे  १७ मुले उत्स्फूर्त सहभाग घेऊ लागलीपालकांना सदर उपक्रमात शाळा जणू खूप जवळची वाटू लागलीमुले तर  माना हो शालत जायाचा आहे. असे पालकांना सांगू लागली.
                 अशा प्रकारे रोज नियमित पुस्तकाचे वाचन होऊ लागलेआठवड्यात नवीन शैक्षणिक अध्ययन बोलीभाषा साहित्य निर्मिती होऊ लागलीमुले स्वत:  बोलीभाषा साहित्य वाचन करू लागले  स्वतसाहित्य ( गाणी ,वाक्य , गोष्ट , कथा , चित्रवर्णन  .) तयार करत आहेतप्रत्येक विद्यार्थी  बोलीभाषा साहित्य जेवढ्या आवडीने वाचन करत आहे तेवढ्याच आवडीने प्रमाणभाषेतील वाचन साहित्य  क्रमिक पुस्तके वाचन करीत आहेत.



         सदर उपक्रमाची कार्यवाही - महिन्यात करण्यात आली असून मुले आनंदाने वाचन करू लागली आहेत.
 नवोपक्रमाची फलनिष्पत्ती @
१) इयत्ता १ ली ते २री चे  १७ आदिवासी वारली बोलीभाषा अवगत विद्यार्थी बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे वाचनास प्रवृत्त झाले.
२) खेळ,गाणी,गोष्टी,नाट्यछटा,संवाद ,वारली वर्णमाला निर्मितीत विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेचा सहभाग घेऊन अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती झाली .
३) अध्ययन अध्यापनात आवड व रुची निर्माण झाली .
४) शालेय उपस्थिती व गुणवत्ता वाढीसाठी  सदर उपक्रमाची उपयुक्तता वाढविली .
५) बोलीभाषेच्या माध्यमातून शालेय विकासासाठी समाज सहभाग वृद्धिंगत झाला  .
६) आदिवासी पाड्यावर अध्ययन- अध्यापन करणार्‍या सर्व शिक्षक बांधवांना मार्गदर्शक  ठरेल असे बोलीभाषेत अध्ययन साहित्य निर्मिती झाली  .
७) विद्यार्थी  सदर उपक्रमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली.
अशाप्रकारे नवोपक्रमातून  फलनिष्पत्ती करण्यात यशस्वीता मिळाली.

 प्रातिनिधीक स्वरुपात शैक्षणिक अध्ययन वारली भाषा साहित्य 
प्रमाणभाषा
वारली भाषा
स्वरूप
आजीबाईची गोष्ट 

वाडघिनचा डांगर

गोष्ट
आम्हांला पण पाहिजे मोबाईल

आम्हांना हो पायज मोबाइल
संवाद
 ली पाठ्यपुस्तक प्रमाणभाषा
.१ली वारली भाषा पाठ्यपुस्तक
पाठ्यक्रम
पाणी किती खोल ?
पानी कती ओंढा ?
नाटयीकरण
शब्दसंग्रह  ( प्रमाण भाषा )
शब्दसंग्रह ( वारली भाषा )
शब्दसंग्रह
जिंकेल कोण ?
जिखल कोन ?
चित्रकथा
वर्णमाला
वारली बोलीभाषा वर्णमाला (व्यंजन,स्वर)
वर्णमाला
अशा प्रकारे अनेक अध्ययन वाचन   अध्ययन कृतियुक्त साहित्य वारली बोलीभाषेतून तयार करण्यात आलेली आहेशाळेत अध्यापन करताना वारली बोलीभाषेचा प्रामुख्याने अधिक वापर केला जातो तसेच उदाहरणे देताना परिसरातील घटना ,  प्रसंगे ,अनुभव यांचा वापर अध्यापनात केला जातो.

     “प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र” या उपक्रमांतर्गत २०१७-१८ च्या तिसर्‍या वारीत माझ्या बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे अंतर्गत, “आदिवासी वारली बोलीभाषेतून अध्ययन साहित्य निर्मिती.”या उपक्रमाला संधि मिळाली व लातूर-अमरावती-रत्नागिरी -नाशिक या ठिकाणी झालेल्या वारीत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील जवळपास २०००० पेक्षा जास्त शिक्षकांपर्यंत बोलीभाषेतून शिकषांची गरज का आहे ? हे या उपक्रमातून मांडता आले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी शिक्षकांच्या भेटी झाल्या,त्यांनी उपक्रमाची यशस्वीता त्यांच्या शब्दात मांडली. 
📌📌📌📌📌📌📌📌
श्री. राजन गौतम गरुड 
प्राथमिक शिक्षक 
जि प शाळा खोरीचापाडा, 
 केंद्र: परगाव ,ता/जि: पालघर
📲 7875313385/7057540074

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)