हाच तो शिक्षक

Rajan garud
0

शिक्षक' म्हणजे एक समुद्र,
ज्ञानाचा,......
पवित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला......
शिक्षक अपुर्णाला पूर्ण करणारा....
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातुन जिवन घडवणारा,
शिक्षकतत्वातून मुल्ये फ़ुलवणारा.....
ध्येय दिसते,तिथे नेतो शिक्षक,
सत्यते,शिकवतो,
वदवून घेतो तो शिक्षक,
ज्ञानाचीओळख....
पुर्णत्व म्हणजे शिक्षक,
निस्वार्थ तळमळीने शिकवितो तो शिक्षक.....
शिक्षा एक नावडते अंग शिक्षकाचे,
त्यातूनही ध्येयअसते ज्ञान देण्याचे,
शिक्षक अचरणातुनही शिकवत असतो,
म्हणूनच शिक्षक पूर्ण असावा लागतो......
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक......

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)