नमस्कार मित्रांनो, ""शिकवतायना, मग शिकवायलाच पाहिजे,उपक्रमशील होताय ना,मग व्हायलाच पाहिजे; कारण नाविन्यपूर्ण शिक्षणाचा व विद्यार्थी घडविण्याचाच आपला अट्टाहास" तुमच्या सर्वांसाठी पुन्हा घेऊन येत आहे मी स्वतः ज्ञानरचनावादावर काही उपक्रम राबविले ,त्यापैकी हा एक उपक्रम "कुंडी शब्द फुलवू लागली".अतिशय सोपे व रचनावादी आहे.
राजन गौतम गरुड
💐💐"कुंडी शब्द फुलवू लागली"💐💐
🎂उपक्रमाची उद्दिष्टे:-
१)शब्दसंपत्तीत वृद्धी होणे.
२) सहज उपक्रमातून शब्द वाचण्याची आवड निर्माण करणे.
३)शब्द शोधून वाचण्याची पुनरावृत्ती करणे.
४) वाचनाची भीती दूर करणे.
५)कला,कार्यानुभवातून कल्पकता निर्माण करणे.
६)स्वयंअध्ययन अथवा स्वयंनिर्मिती कडे प्रभावित करणे.
🎂 साहित्य:-
१) कातर, डिंक,मोठी सुकलेली पातळ काठी,कोरे कागद,पॉलीश पेपर,उडन अथवा वॉटर कलर,
स्केच पेन,मार्कर , कुंडी अथवा प्लॅस्टिकची थंड पेयांची मोठी बाटली इत्यादी.
🎂 प्रत्यक्ष् कृती:-
१) सर्वप्रथम रिकामी बाटली अथवा कुंडी घ्या .नंतर त्यात निम्म्यापेक्षा जास्त माती घ्या.
२)कुंडीत घेतलेल्या मातीत काडी रोवण्यापूर्वी तिला पॉलीश पेपर ने वॉश करून उडन अथवा साधा व
वॉटर कलर शोभेल असा लावा आणि तयार काडी कुंडीत रोवा.
३)आता कोऱ्या पेपर चे झाडाच्या पानांचे आकार कापून घ्या.
🎂 उपक्रम:-
मित्रांनो आता आपण उपक्रम पूर्ण करूया कारण या झाडाला पाणी घालण्याऐवजी रोज शिकवलेल्या पाठातून आलेले नवीन शब्द संग्रह करून विद्यार्थ्यांना गटांत वाटून अथवा एकाला एक शब्द देऊन कापलेल्या पानांचे आकार वाटप करावे आणि शब्द स्केच पेनाने लिहून कुंडीतील काडीला डिंकाने चिकटवावे. पाने सुशोभित केली आणि नंतर चिकटवली तरी छान वाटेल.अशी शब्द फुलवणाऱ्या कुंड्या तयार करून आपल्या शाळेच्या ओटीवर ठेवले असता अधीक सुंदर दिसते व विद्यार्थी रोज शाळेत येताजाता शब्द वाचतात .शब्दकुंड्या ह्या विद्यार्थ्यांच्या शब्द संग्रह वाढीसाठी खूपच महत्वपूर्ण ठरलं.
🎂 उपक्रमासंदर्भात काही चुका असतील तर प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात.g arudrajan
राजन गौतम गरुड
जि प शाळा खोरीचापाडा ,
केंद्र पारगाव
ता.जि.: पालघर
४)rajanaish88@gmail.com
उत्तर द्याहटवा